महाराष्ट्र मुंबई

विविध‌ योजनेअंतर्गत 5 लाख घरकुलांना मंजुरी देणार; हसन मुश्रीफांची घोषणा

मुंबई | ग्रामीण भागात विविध योजनांतर्गत 5 लाख 4 हजार घरकुलांना मंजुरी देणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुंश्रीफ यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील सर्वसाधारण क्षेत्रात 1 लाख 20 हजार निधी घरकुलांना दिला जाणार आहे. तर ,नक्षलग्रस्त भागात 1 लाख 30 हजार दिले जाणार आहेत, असं हसन मुंश्रीफ यांनी सांगितलं आहे.

केंद्र आणि सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी योजना इतर योजनांच्या अंतर्गत घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे.

घरकुलांचे बांधकाम वेळेवर होण्यासाठी 33 हजार गवंड्यांना प्रशिक्षण व साहित्य संच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या