बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’; अन् महापूरही भावाच्या लग्नाला रोखू शकला नाही!

सांगली | गेला आठवडाभर पडणाऱ्या तुफान पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला चांगलाच फटका बसला आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच लोक या संकटाचा सामना करत असताना एक व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

सांगलीतून व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लग्नाचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीमध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे. घर, दुकानंही पाण्याखाली गेली आहेत. एवढ्या पाण्यातून आपल्या नवरीला घरी कसं आणायचं म्हणून युक्ती लढवत नवरदेवानं बोट मागवली आणि वरात काढली. अन् आपल्या नवरीला घरी घेऊन आला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला सोशल मीडियावरुन भरपूर प्रतिसाद आलेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर खूप सारे मीम्सही बनवण्यात येत आहेत.

या व्हिडीओवर चांगल्या, वाईट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. हा व्हि़डीओ शेअरही करण्यात येत आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लग्नाचे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात.

दरम्यान, राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

थोडक्यात बातम्या –

पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर

आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणतात…

राज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर

राज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More