मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजच्या माध्यमातून शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत ही तक्रार करण्यात आली आहे.
‘हाताची घडी, तोंडवर बोट’च्या माध्यमातून आमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. आक्षेपार्ह मजकूर डिलीट व्हावा, तसेच हे पेज कायमचं बंद केलं जावं, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
संबंधित पेजवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट-
महत्त्वाच्या बातम्या-
-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश
-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!
-महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही, निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी!
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची विष घेऊन आत्महत्या!
-निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच बिनसलं; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी