बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त, मी रोज करते तुम्ही पण करा- हेमा मालिनी

मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी अजब दावा केला आहे. कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आलं. यावेळी हेमा मालिनी यांनी कोरोनातून बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मी धूप घालून हवन करत आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळेस करते. या दोन्ही वेळेस धूपयुक्त हवन केल्याने गृहक्लेशही होत नाही. यामध्ये तूप, नीमची पाने आणि लोबान यांचा समावेश करावा, असं हेमा मालिनी यांनी सांगितलं.

लोबान आणि अन्य सामग्रीमुळे आजार रोखण्यास मदत होते. तसेच धूपयुक्त  हवनमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं. मी रोज हवन करते, तुम्हीही करा, असा सल्ला हेमा मालिनी यांनी सर्वांना दिला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 14 हजार 460 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल पण…- संभाजीराजे आक्रमक

रायगडावर संभाजीराजेंची गर्जना, पहिल्या मराठा मोर्चाची तारीख अन् ठिकाणही ठरलं!

माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण दिशाभूल करणं रक्तात नाही- खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More