बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त झाल्यावर शारीरिक संबंध ठेवावे की नाही?, तज्ज्ञांनी दिला हा महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना शारीरिक संबंध ठेवावे की नाही हा प्रश्न पडत आहे. याबाबत आता तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे. जर कोणामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली तरी बरे झाल्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेऊ नये, असं आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोनातून बरं झाल्यावर काही दिवस किस करणं टाळावं. तसेच शारीरिक संबंध ठेवणं देखील टाळावं. तज्ज्ञांच्या मते शारीरिक संबंध ठेवणं हे जवळपास 30 दिवस तरी पाळावं. एवढंच नाही तर कोरोना होऊन पुन्हा कोरोना झाला आणि 30 दिवसांनंतर शारीरिक संबंध ठेवत असाल तर कंडोमचा वापर करावा. ही संपुर्ण माहिती थायलंडचे तज्ज्ञ वीरावत मनोसुट्टी यांनी दिली आहे.

चीनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शुक्राणूमध्ये कोरोना विषाणू असू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. बरं झाल्यानंतर जर पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवले तरी शरीरात असलेल्या कोरोना विषाणूचा या मार्फत संसर्ग होऊ शकतो.

दरम्यान, चीनच्या संशोधनानुसार, 33 रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यामधील 15 रुग्णालयात होते तर 23 कोरोनातून बरे झालेले होते. ज्यावेळी सॅम्पलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी यामधील एकूण 6 लोकांच्या शुक्राणूमध्ये कोरोना विषाणू आढळून आले.

थोडक्यात बातम्या-

20 हजार विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात मोठी संधी; राज्य सरकारचा अभिनव उपक्रम

राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड- चंद्रकांत पाटील

लसीकरणाबाबत रोहित पवारांनी मोदी सरकारला दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले…

मोदी सरकारचं मोठं पाऊल, नवं चॅनल सुरु करणार!

“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More