बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळदेखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते. साधरण नवी दिल्ली ते वॉशिंग्टन हा प्रवास 15.30 तासांचा असतो, मात्र पंतप्रधान मोदींचं विमान कोणत्याही थांब्याशिवाय वॉशिंग्टनमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांचे विमान कमी वेळेत पोहोचले.

3मोदींच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर मोदींनी एक फोटो ट्विट केला आहे. लांब हवाई यात्रा म्हणजे पेपर वर्क पूर्ण करण्याची, कागदी कार्यवाही पूर्ण करण्याची संधी असते, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे, अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेसाठी रवाना झाले. यासाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली होती. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. यासाठी भारत सरकारने पाकिस्तानकडे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी मागितली होती, ज्याला पाकिस्तानी सरकारने सहमती दर्शवली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

मोठी बातमी! एमपीएससी आयोगाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More