बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक ना भावा! दुचाकीनं चालणारी ही रूग्णवाहिका पाहिलीत का?, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्या देशात टॅलेंटची कमी नाही, असं म्हटलं जात मात्र त्याला कारणही तसं आहे. कोण कशाप्रकारचा जुगाड करून आपलं काम पुर्ण करेल याचा काही नेम नाही. अशाच प्रकारे एका तरूणाने आपलं करामती डोकं लावत जुगाड केला आहे. त्याचा हा जुगाड यशस्वी झाला असून सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

ओडिशामधील एक तरूणाने रूग्णवाहिका तयार केली आहे. तयार केली आहे म्हणजे ही रूग्णवाहिका दुचाकीला जोडलेली आहे. त्यामुळे ज्या भागांमध्ये दळणवळनासाठी अडचणी आहेत, अशा भागात ही रूग्णवाहिका संजीवनी ठरण्याची शक्यता आहे. संबंधित तरूणाने लोखंडी चौकोनी डबा केला आहे आणि त्यात एक माणूस झोपू शकतो अशी रचना ठेवली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिलेला रूग्णालयात नेलं जात आहे. त्याने गाडीवर लाल अक्षरात अॅम्बुलन्स असं लिहिलेलं आहे. इतकच नाही तर गर्दीच्या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी गाडीला सायरन बसवला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे.

दरम्यान, भारतीय शोध असं कॅप्शन रुपीन शर्मा यांनी दिलं आहे. सर्वत्र या देशी जुगाडाचं कौतुक होत आहे. तरूणाचा हा देशी जुगाड ज्या भागात अद्यापही रस्ते व्यवस्थित नाहीत अशा ठिकाणी उपयोगी पडू शकतो.

 

थोडक्यात बातम्या- 

‘मैनू काला चष्मा जचता है’ म्हणत नवरीची लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हायरल व्हिडीओ

पत्नीच्या फोटोवरुन नवा वाद; इरफान म्हणतो, मी तिचा मालक नाही!

होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More