आता लग्नाआधी सेक्स करणं ठरणार गुन्हा, जाणून घ्या नवीन कायदा
नवी दिल्ली | हल्ली नवीन नातं सुरु झाल्यावर शरीरसंबंध प्रस्थापित केले जातात. लग्नापूर्वीही मुला-मुलींनीं सेक्स (Sex) करणं नॉर्मल मानलं जातं. मात्र काही ठिकाणी अशा गोष्टींना चूक देखील समजलं जातं.
नुकतंच भारतात उच्च न्यायालयाने (High Court) एक निकालाबाबत उत्तर देताना सांगितलं आहे. अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीने शरीरसंबंध ठेवले तर ते मान्य नसतील. त्यामुळे अशा अनेक घटना आपल्या भारतात देखील झाल्याचं पहायला मिळतं.
अनेकदा लग्नाचं अमिष दाखवून मुलींशी शारीरिक संबंध जोडले जातात. नंतर लग्नासाठी नकार दिला जातो. त्यामुळे आता याविषयी एका देशात एक नवीन कायदा अस्तित्वात आला आहे. इंडोनेशिया(Indonesia) या देशात लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार आहे.
इंडोनेशियाच्या संसदेने लग्नाआधी लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला(Bill) मंजुरी दिली आहे. या कायद्यानुसार केवळ पती-पत्नीच शारीरिक संबंध ठेवू शकतात. विवाहित जोडप्यातील व्यक्तीने दुसऱ्या जोडीदारासोबत संबध ठेवल्यास या गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
तुम्ही अविवाहित असून देखील लैगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा मानला जाईल. यासाठी कारवाई तेव्हाच केली जाईल जेव्हा आई-वडिल त्यांच्याविरोधात तक्रार (complaint) करतील. तसेच विवाहित जोडप्यांच्या बाबतीत एखादी महिला किंवा पुरुषांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल.
तक्रारारीनुसार कोर्टात खटला दाखल होण्यापूर्वी तुम्ही तक्रार मागे घेऊ शकता. मात्र एकदा का खटला दाखल झाला तर तो तुम्हाला मागे घेता येणार नाही. त्यामुळे गुन्हेगाराला एक वर्ष तुरुंगवास (Imprisonment) आणि काही आर्थिक दंड भरावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “प्रकाश आंबेडकर जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले तर….”
- RBI चा सर्वसामान्यांना धक्का, घेतला मोठा निर्णय
- ‘उद्धवजी तुमचं बाळ कुठं गेलं?’; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचलं
- जागतिक स्तरावरचा ‘हा’ मान मिळवणारी दीपिका ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री
- आफताबला तिहार जेलमध्ये करायचंय ‘हे’ काम; पोलिसांकडे केली मोठी मागणी
Comments are closed.