बंगळुरू | भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. देवेगौडा व त्यांच्या पत्नी चेनम्मा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती त्यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच त्यांना बंगळुरूच्या राहत्या घरी होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून एच.डी देवेगौडा यांच्या तब्येतीची विचारपुस केली. तसेच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ही माहीती देत देवेगौडा यांच्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं सांगितलं. देवेगौडा यांनीही संबंधित गोष्टीबद्दल माहीती देत पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले. मोदींनी फोनवरून त्यांना शहरातील आपल्या मनाने कुठल्याही रूग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिल्याचंही देवेगौडा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एच.डी देवेगौडा यांनी 1 जुन 1996 ते 1 एप्रिल 1997 या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी भारताचे पंतप्रधानपद भुषवलं असुन ते मागच्या वर्षी राज्यसभेवर खासदार म्हणुन निवडुन गेले आहेत. जनता दल सेक्युलर या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे देवेगौडा यांचे पुत्र आहेत.
1953 साली देवेगौडांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली होती, जो अजुन त्यांच्या 87 व्या वर्षीही सुरू आहे. देवेगौडा यांनी ट्विटरवरून आपली आणि आपल्या पत्नीची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचं सांगुन संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
I am grateful to Prime Minister @narendramodi for calling and enquiring after my health. I am also deeply moved by his offer to get me treated in any hospital of my choice in any city. I assured him that I am being looked after well in Bangalore, but will keep him informed.
— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
Spoke to former PM Shri @H_D_Devegowda Ji and enquired about his and his wife’s health. Praying for their quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2021
थोडक्यात बातम्या–
अॅम्बुलन्सचं स्पीड इतकं की, व्हिडीओ पाहून लोकंही झाले चकीत, पाहा व्हिडीओ
इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर, अमेय खोपकर म्हणतात…
पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो! – रोहित पवार
नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात पत्र व्यवहार; इम्रान यांचं पुन्हा ‘काश्मिर’ गुऱ्हाळ
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 80 टक्के कोरोनाबाधितांना लक्षणंच नाही
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.