HDFC Bank l तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. HDFC बँकेने आठवड्याच्या शेवटी एक मोठी अपडेट जारी केली आहे. HDFC बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग सेवा 2 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर बँकेची महत्वाची कामे करायची असतील तर आज तुम्ही करू शकता.
दोन दिवस मोबाइल बँकिंग सेवा बंद राहणार :
HDFC बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसनुसार, एचडीएफसी बँक नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग ॲपवरील काही व्यवहार 9 जून आणि 16 जून रोजी काम करणार नाहीत.
बँक ग्राहक 9 जून रोजी पहाटे 3:30 ते 6:30 पर्यंत या सेवा वापरू शकणार नाहीत. तर 16 जून रोजी पहाटे 3:30 ते 7:30 या वेळेत या सेवांच्या वापरावर बंदी असणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, खाते उघडणे, ठेवी, निधी हस्तांतरण, ऑनलाइन पेमेंट यांसारखे काही व्यवहार 9 आणि 16 जून 2024 रोजी सकाळी 03:30 ते 06:30 या वेळेत उपलब्ध नसणार आहेत. या कालावधीत HDFC बँकेचे ग्राहक UPI द्वारे पेमेंट देखील करू शकणार नाहीत.
HDFC Bank l सेवा बंद असण्यामागचे कारण काय? :
बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांसाठी बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी सिस्टम अपग्रेड करत आहे. यामुळे HDFC बँकेच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड सेवांमध्ये सुधारणा होईल. यासाठी दोन दिवस कार्डशी संबंधित सेवा बंद राहणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे त्या वेळेत तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. तसेच ऑनलाइन, पीओएस आणि नेटसेफ व्यवहारही करता येणार नाहीत.
HDFC बँकेच्या ग्राहकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. त्यासोबत जर बँकेशी संबंधित काही कामे असल्यास ते आजच लवकर करून घ्यावे, जेणेकरून अडचणींचा सामना करावा लागणार नाही. बँकेने दिलेल्या वेळेनंतर HDFC बँकेचे ग्राहक सुरळीतपणे बँकिंग व्यवहार करू शकतात.
News Title – HDFC Bank online services will not work for 2 days
महत्त्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा असणार खास; शपथविधी कधी व किती वाजता होणार?
राज्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा
आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही
‘शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर…’; कंगना रणौतच्या प्रकरणात बजरंग पुनियाची उडी
फडणवीसांना कितव्या रांगेत बसवलं?, दिल्लीतील गोष्टीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा