HDFC Bank l देशातील सर्वात मोठ्या असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या ग्राहकांना काही तासांसाठी UPI पेमेंट करण्यात अडचणी येणार आहेत. त्या कालावधीत HDFC बँकेचे ग्राहक अनेक थर्ड पार्टी UPI ॲप्सद्वारे पेमेंट करू शकणार नाहीत.
UPI सेवा 3 तास काम करणार नाही :
एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, UPI सेवांसाठी देखभाल नियोजित असणार आहे. देखभाल दुरुस्तीचे काम 24 तास चालणार आहे. एचडीएफसी बँकेच्या UPI सेवा नियोजित देखभालीच्या 3 तासांच्या दरम्यान कार्य करणार नाहीत. यामुळे, एचडीएफसी बँकेचे ग्राहक GPay, WhatsApp Pay, Paytm सारख्या थर्ड पार्टी ॲप्ससह अधिकृत बँकिंग ॲपद्वारे किंवा UPI द्वारे व्यवहार करू शकणार नाहीत.
भारतातील सर्वात मोठ्या बँकेने UPI सेवांसाठी 10 ऑगस्टच्या रात्री पहाटे 2:30 ते पहाटे 5:30 पर्यंत नियोजित देखभाल वेळ निश्चित केली आहे. म्हणजेच आज रात्री 2:30 ते पहाटे 5:30 या तीन तासांत HDFC बँकेच्या UPI सेवा काम करणार नाहीत. बँकेने देखभालीसाठी रात्रीची वेळ निवडली आहे, जेणेकरून त्यांच्या वापरकर्त्यांना कमीतकमी समस्यांना सामोरे जावे लागेल.
HDFC Bank l देखभाल दुरुस्तीनंतर सेवा सुधारणार :
या देखभालीनंतर HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी UPI सेवा सुधारणार आहेत. एचडीएफसी बँकेचे म्हणणे आहे की, यूपीआय डाउनटाइम त्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यास मदत करेल. खाजगी बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना मेल पाठवून UPI डाउनटाइमबद्दल माहिती दिली आहे.
बँकेने मेलवर दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या चालू आणि बचत खातेधारकांसाठी नियोजित देखभालीच्या 3 तासांमध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार अनुपलब्ध असतील. याशिवाय, एचडीएफसी बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप आणि एचडीएफसी बँकेच्या खात्याशी जोडलेल्या जीपीए, व्हॉट्सॲप पे, पेटीएम, श्रीराम फायनान्स खात्यांद्वारे आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
News Title- HDFC Bank UPI downtime
महत्वाच्या बातम्या-
ठरलं तर! ‘या’ दिवशी सत्ताधारी व विरोधक प्रचाराचा नारळ फोडणार
पुण्यात आणखी एक हिट अँड रन; पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीला नेलं फरफटत
ठाकरेंच्या उमेदवाराची करामत!, विनेश फोगाटला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल
पुणे ते बीड 250 किलोमीटर, बजरंग सोनवणेंनी संसदेत बोलताना सांगितलं 500 किलोमीटर!
पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतंय बक्कळ व्याज; महिन्याला कमवा 10 हजार रुपये