नवी दिल्ली | हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) लिमिटेडकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मंजूरी देण्यात आली आहे.
एचडीएफसीच्या संपूर्ण मालकिच्या उपकंपन्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेडचे एचडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीगीकरण करण्यासाठी त्यांच्या बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एचडीएफसी बँक आता 100 टक्के सार्वजनिक भागदारांच्या मालकीची असणार आहे.
एचडीएफसी लिमिटेडचे विद्यमान भागदारक एचडीएफसी बँकेच्या 41 टक्के मालकिचे असतील, असंही कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केलं आहे. तर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक विलीनीकरणाची प्रक्रिया ही आर्थिक वर्ष 2024च्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेला त्यांचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याच्या ग्राहकांमध्ये देखील वाढ होईल. एचडीएफसीच्या वतीने आज या विलीनीकरणाला मान्याता देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”
विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
40 दिवसांपासून ना अन्न आहे ना पाणी, युक्रेनियन नागरिकांची बिकट परिस्थिती
14 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना, वाचा आजचे दर
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG च्या दरातही वाढ; वाचा आजचे दर
Comments are closed.