HDFC SMS Alert | एचडीएफसी बँकच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट समोर आलीये. बँकेने काही नवीन नियम काढले आहेत. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून प्रचलित असणाऱ्या एचडीएफसी बँक ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता ट्रेक्स्ट मेसेज मिळणार नाहीत. बँकेनं हा निर्णय घेतला असला तरी त्याची लगेच अंमलबजावणी होणार नाही.
‘या’ तारखेपासून होणार मोठा बदल
तर, पुढच्या महिन्याच्या 25 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 25 जून 2024 पासून हा बदल केला जाईल. अर्थातच यूपीआयच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्याला 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तर फक्त एसएमएस अलर्ट पाठवला जाईल.
म्हणजेच 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम (HDFC SMS Alert) मिळाल्यास एसएमएस अलर्ट पाठवण्यात येणार असल्याचं एचडीएफसी बँकेने म्हटलं आहे. दरम्यान बँकेकडून ईमेल अलर्टमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीये.
यूपीआय पेमेंट संदर्भात महत्वाचा बदल
ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहारांवर ईमेल (HDFC SMS Alert) अलर्ट मिळतील. बँकेनं सर्व ग्राहकांना आपला ईमेल अपडेट करण्यास सांगितलं असून अपडेट करण्यासाठी एक लिंकही पाठवली आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या 11.8 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
News Title – HDFC SMS Alert remove on small transactions
महत्त्वाच्या बातम्या-
सातबाऱ्यामध्ये होणार बदल, महसूल विभागानं घेतला सर्वात मोठा निर्णय
कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी माहिती, डॉक्टरनेच दिला ‘तो’ धक्कादायक सल्ला
लेकाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने डॉक्टरला… कल्याणीनगर अपघात प्रकरणी नवी माहिती उघड
प्रियंका-निकच्या वयाबद्दल प्रियंकाच्या आईने केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना नवा आदेश; मंत्री-आमदार-खासदार सगळेच अडचणीत!