HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल

HDFC SMS Alert | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट समोर आलीये. बँकेने काही नवीन नियम काढले आहेत. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून प्रचलित असणाऱ्या एचडीएफसी बँक ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता ट्रेक्स्ट मेसेज मिळणार नाहीत. या महिन्यातच हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

‘या’ सेवेत झाला मोठा बदल

25 जून 2024 पासून 100 रुपयांपेक्षा कमी यूपीआय ट्रान्झॅक्शन आणि 500 रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटसाठी एसएमएस अलर्ट न पाठवण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आला आहे. तर, ईमेल द्वारे नोटिफिकेशन ग्राहकांना मिळतील.

ग्राहकांनी ईमेल नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपला ईमेल आयडी अपडेट करावा अशी सूचनाही बँकेकडून करण्यात आली आहे. तुमचा ईमेल आयडी बँक खात्याला जोडलेला नसेल तर (HDFC SMS Alert )तो अपडेट करुन तुम्ही ईमेल नोटिफिकेशन प्राप्त करु शकता.

ईमेल आयडी अपडेट कसा करणार?

ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी (HDFC SMS Alert ) सर्वप्रथम https://www.hdfcbank.com/ या वेबसाईटवर जा. त्यानंतर Insta Service ऑप्शन वर क्लिक करा. आता मेनूवर स्क्रोल डाउन करत Update Email ID हा ऑप्शन निवडा. या ठिकाणी Let’s Begin वर क्लिक करा.

यानंतर बँक खात्याशी जोडलेला तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर जन्मतारीख, पॅन किंवा कस्टमर आयडी व्हेरिफाय करून घ्या. हे झाल्यावर Get OTP वर क्लिक करा. मिळालेला OTP टाकून पुढे सांगितलेली प्रक्रिया करुन ईमेल आयडी अपडेट करा.

News Title – HDFC SMS Alert remove

महत्त्वाच्या बातम्या-

सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; 10 ग्रॅमचे भाव फक्त..

सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; 1 रुपयात पीक विम्याच्या नावाखाली मोठा घोटाळा समोर

…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?

पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये