HDFC चा ग्राहकांना सर्वात मोठा झटका!
नवी दिल्ली | HDFC ने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. होमलोन घेतलेल्या ग्राहकांनासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी (HDFC) लिमिटेडने आपल्या कर्जदरात 35 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.35 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृहकर्जाचा किमान दर आता 8.65 टक्के झाला आहे.
आरबीआयच्या रेपो दरात एकापाठोपाठ एक वाढ केल्यानंतर बँकांपासून ते गृहनिर्माण संस्थांपर्यंत व्याजदरात वाढ होत आहे. आधी SBI आणि आता HDFC ने गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.
आता उर्वरित बँकाही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. लोकांना महागडे कर्ज फेडावे लागेल.
HDFC चे गृहकर्जाचे व्याजदर 8.20 टक्क्यांपासून ते 8.55 टक्क्यांपर्यंत असू शकतात. HDFC ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की HDFC ने घरांच्या कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) मध्ये 35 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे.
HDFC ने रिटेल प्राइम लेंडिंग रेट वाढवल्यानंतर EMI महाग होईल. एचडीएफसीने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की अॅडजस्टेबल रेट होम लोनला फ्लोटिंग किंवा व्हेरिएबल रेट लोन असेही म्हणतात. ARHL मधील व्याजदर HDFC च्या बेंचमार्क दराशी म्हणजेच रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) शी जोडलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- आता 500 रूपयात मिळणार गॅस सिलेंडर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- काँग्रेसचा ठाकरेंना धोबीपछाड; ‘या’ ग्रामपंचायत निकालाची महाराष्ट्रात चर्चा
- “आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील, कोणी काहीही काळजी करु नका”
- “पुढच्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो”
- जबरदस्त फीचर्स असेलली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाॅंच
Comments are closed.