बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले’; पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक!

मुंबई | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. या काळात सर्वच राज्यांच्या सरकारांनी संपूर्ण मेहनतीने काम केलं. मात्र, कोरोनाकाळात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पवारांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, प्रेश्नम या संस्थेने भारतातील विविध राज्यांसाठी मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटींग सुरु केली आहे. प्रेश्नमने केलेल्या सर्वेक्षनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्वाधिक पसंती मिळवली आहे. प्रेश्नम या संस्थेने देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं आहे. उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.

प्रेश्नम संस्थेने निवडलेल्या 13 राज्यांमध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल”

राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार? केंद्रात हालचालींना वेग

“मतदान घ्या पाहू तुमची ताकद, बहुमत आहे तर मग घाबरता कशाला?”

कोरोनाकाळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी विकली किडनी अन्….

कोरोना झाल्यानं तरुणानं वाढदिवसादिवशीच उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More