बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो येऊन जबाब देऊन गेला, पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं?’; फडणवीसांचा सरकारवर घणाघात!

मुंबई | पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील उस्मानी यानी हिंदू धर्मावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षातर्फे करण्यात आली. तसेच पुण्यात येऊन हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलणाऱ्या शर्जील उस्मानीविरुद्ध कलम 153-अ आणि 295-अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने पुणे पोलिसांना केली होती.

विधानभवनात या प्रकरणावरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. विधानसभेत छातीठोकपणे मुख्यमंत्री म्हणाले होते की, ‘शर्जील उस्मानी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तरी त्याच्या मुसक्या आवळून त्याला शोधून आणणार म्हणजे आणणारच!’ प्रत्यक्षात तो येऊन जबाब देऊन गेला पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं? असा प्रश्न ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. शर्जील उस्मानी विरोधात असलेल्या तक्रारी मध्ये भारतीय दंड विधान कलम 295-अ चा समावेश असताना एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष करण्यासाठी लावले जाणार हे कलम पद्धतशीरपणे वगळून जे विविध घटकांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल अशा विधानांसाठी लागतं असं कलम 153-अ या प्रकरणात जाणीवपूर्वक लावण्यात आलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार? असा प्रश्न विचारत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

थोडक्यात बातम्या –

‘…पण एका मंत्र्याची विकेट पडणार’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान!

बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

अरे बापरे! बादलीभर ‘बिअर’ काही सेकंदात फस्त, पाहा आश्चर्यचकित करणारा हा व्हीडिओ

नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागारांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More