Top News परभणी महाराष्ट्र

उपचारांसाठी आजीला पाठीवर घेऊन ‘तो’ 3 किमी पायी गेला!

परभणी | ग्रामीण भागात खासकरून पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली पहायला मिळते. यातच जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा गावात रस्ता नीट नसल्याने एका तरूणाला चक्क आजारी आजीला तीन किलोमीटर पाठीवर घेऊन जावं लागलंय.

पिंप्राळा गावातील 85 वर्षीय कौसाबाई चाफे यांना अचानक त्रास सुरु होऊन जुलाब आणि उलट्या झाल्या. गावात खासगी ठिकाणी इलाज करुन देखील त्यांच्या तब्येतीत काडीमात्र फरक पडला नाही.

अखेर या आजीचा नातू राजकुमार चाफेने (18) तिला कापडाने पाठीवर बांधलं आणि पुढील उपचारांसाठी जिंतूरला नेण्याचं ठरवलं. यासाठी राजकुमार आजीला घेऊन चिखल तुडवत तब्बल तीन किलोमीटर पायीच गेला.

महत्वाच्या बातम्या-

चांगली बातमी! राज्याचा मृत्यूदर 2.66 टक्क्यांपर्यंत घसरला

आतापर्यंत पाहिलेलं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, पूरनच्या कामगिरीने सचिनही इम्प्रेस

धोनीलाही मागे टाकत तेवतियाने ‘हा’ विक्रम केला स्वतःच्या नावावर!

या’ कारणामुळे संजय राऊत यांची भेट घेतली- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या