बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कलेक्टर आहे ‘तो’ शिवसेनेचा, सगळ्यांचे पैसे गोळा करतो”

मुंबई |  राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी काही मागण्या राज्य सरकारपुढे ठेवत बेमुदत संप पुकारला होता. गुरूवारी राज्य सरकारने 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे देण्याचं मान्य केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला आहे. शुक्रवारी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कित्येक महिने नाहीये. आज एसटीची अवस्था खुप वाईट आहे. एसटीची अवस्था अशी झाली आहे की, गाड्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी नाही दिली पाहिजे. नारायण राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

खरं त्याच्या उत्पन्नातुन एसटी चालू शकते एवढं कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो कलेक्शन आहे. ‘कलेक्टर आहे तो शिवसेनेचा’, असं म्हणत नारायण राणे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांसमोर येत काही एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या ही खरचं दुर्देवी घटना आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, गेली दोन वर्षे एसटीची परिस्थिती अतिशय वाईट होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. ही गोष्ट माझ्या निदर्शनास येत आहे की, एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसात आत्महत्या करताहेत. त्याची कारण वेगवेगळी असतील. ही गोष्ट सत्य आहे की, पगारमध्ये काही वेळेस दिरंगाई होते. पगार वेळेवर मिळत नाही. त्यांच्या काही आर्थिक समस्या आहेत, हे मंत्री अनिल परब यांनी मान्य केलं आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की पगार दयायला थोडासा उशीर होतोय, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“2024मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचं असेल तर…”

सेनसेक्समध्ये मोठी घट! गुंतवणूकदारांना तब्बल ‘इतक्या’ कोटींचा फटका

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर कोरोनामुक्त

‘MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना आणखी दोन संधी द्या’; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अन् न्यायालयाने दिले थेट जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More