बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”तो’ लपून बसला नाही, तो सध्या…’; प्रभाकर साईलच्या वकिलांचा मोठा खुलासा

मुंबई | किरण गोसावीचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईल यांनी किरणने आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटी रुपयांची डील केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यानंतर सर्वत्र एकत्र खळबळ उडाली होती. अशातच आता त्याने आणखीन एक खुलासा केला आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतंय.

वानखेडेंच्या चौकशीत प्रभाकर साईल सहकार्य करत नसल्याचा आरोप एनसीबीने केला होता. तर चौकशीला बोलवलं असता तो चौकशीला आला नाही, असंही एनसीबीने म्हटलं होतं. त्यानंतर आता प्रभाकर साईलला कोणत्याही प्रकराच्या संपर्क एनसीबीने केला नव्हता असा दावा साईलचे वकिल हेमंत इंगळे यांनी केला आहे. त्यानंतर आता एनसीबीच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येतंय.

प्रभाकर साईलला कोणत्याही प्रकराच्या संपर्क एनसीबीने केला नव्हता. तो सध्या मुंबईत आहे आणि तो चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे, असंही हेमंत इंगळे यांनी म्हटलं आहे. एनसीबीला जर जवाब नोंदवायचा असेल तर योग्य प्रक्रियेचं पालन केलं पाहिजे, असंही हेमंत इंगळे म्हणाले आहेत.

दरम्यान, हेमंत इंगळे यांनी आज एनसीबी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 22 जुलैला ड्यूटी वर जाॅईन झालो होते. मी 50 लाख रुपये पाॅलिथीन बॅगेतून घरी नेल्याचा खळबळजनक दावा प्रभाकर साईलने केला होता.

थोडक्यात बातम्या-

‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असाल तर…’; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘सिर्फ घर नहीं, यहां तो पुरी सरकारही…’; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

‘भारतात कधी मुस्लीम व्होट बँक नव्हतीच, फक्त…’; असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक वक्तव्य

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

फडणवीसांच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More