बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

औरंगाबाद | कोणतीही गाडी चालवताना त्या गाडीची संपूर्ण माहिती असणं फार म्हत्वाचं असतं. आपण टीव्हीतील कार्यक्रमांमध्ये पाहतो की, एक व्यक्ती खूप वेगात गाडी चालवत असतो. गाडी चालवताना त्याच्या अचानक लक्षात येतं की त्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत. मग त्यावेळी तो व्यक्ती अनोख्या पद्धतीने युक्ती लढवतो आणि आपला जीव वाचवतो.

औरंगाबादमधील जालना-सिलोद रस्त्यांवर असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील जालना-सिलोद रस्त्यावरील ट्रकचा ब्रेक फेल झाला. यानंतर ट्रकचा अपघात टाळण्यासाठी जालना-सिलोद हा मुख्य रस्ता असल्यामुळे समोरून सतत गाड्यांची वर्दळ सुरू होती. त्यामुळे ट्रक नेमका रस्त्याबाहेर कसा घ्यायचा, असा प्रश्न ट्रकचालकापुढे होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक गाडी उलट्या दिशेने चालली असल्याचं दिसून येत आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाले असल्यानं ट्रक चालकाने चक्क रिव्हर्स गाडी चालवली आहे. अचानक ब्रेक फेल झाले असल्यानं अपघात टाळण्यासाठी चालकाने युक्ती लढवून रिव्हर्स गाडी चालवण्याचा निर्णय घेतला.

ट्रक चालकाने तब्बल 3 किलोमीटर रिव्हर्समध्ये गाडी चालवली. यामधून चालकाने आपलं गाडी चालवण्याचं कौशल्य दाखवून दिलं आहे. तसेच ही घटना जालना-सिलोद रस्त्यावरील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More