बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर त्याने करून दाखवलं! विदर्भाच्या तरुणाला मिळाली लंडनची स्कॉलरशिप

बुलडाणा | आपल्या भारतभूमीच्या मातीत ध्येयवेड्या तरुणांची कमी नाही. या मायभूमीतील कित्येक तरुणांनी जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरलं आहे आणि आज देखील कोरत आहेत. असंच काहीसं आता बुलडाण्यातील एका तरुणानं देखील करुन दाखवलं आहे. मायभूमीच्या सेवेचा वसा घेतलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पिंपरी या छोट्याश्या गावातील एका ध्येयवेड्या तरुणाने ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली आहे.

या ध्येयवेड्या तरुणाचं नाव राजू आत्माराम केंद्रे असं आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी जे युवक युकेमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात अशा जगभरातील 160 देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी चेव्हेनिंग स्कॉलरशीप दिली जाते. फॉरेन कॉमनवेल्थ डिपार्टमेंटकडून ही स्कॉलरशीप दिली जाते. या प्रतिष्ठित स्कॉलरशिपसाठी विदर्भातील राजु केंद्रेची निवड झाली आहे.

चेव्हेनिंग स्कॉलरशिप अंतर्गत आता राजु केंद्रेला जवळपास 45 लाखांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जगभरातील 19 नामांकित विद्यापीठांमध्ये राजुची निवड झाली आहे. चेव्हेनिंग स्कॉलरशिपमुळे राजू आता त्याला हव्या त्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहे. जिल्हा परिषद, मुक्त विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंस, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय आणि आयपॅक असा प्रवास करत राजू चेव्हेनिंग स्कॉलरशिपपर्यंत येऊन पोहचला आहे. आता राजू केंद्रे हे ज्या विद्यापीठात प्रवेश घेईल त्याची पूर्ण फी व राहणे, तसेच खाण्याचा खर्च या स्कॉलरशिपमधून भागविला जाणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून राजू केंद्रे सहकार्यांच्या मदतीने एकलव्य चळवळ लीड करत आहे. ज्या फर्स्ट जनरेशन लर्नर्सला भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी हक्काची मार्गदर्शन संस्था म्हणून एकलव्य चळवळ काम करत आहे. या चळवळीतील 125 विद्यार्थी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत शिकत आहेत. तळागाळातील तरूणांचं एक भक्कम नेतृत्व तयार करण्याचा राजू केंद्रेंचा मानस आहे. शाहू फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांचा शैक्षणिक वारसा चालवण्यासाठी दोन दशकात विद्यापीठ साकार करण्याचं राजू केंद्रेंचं ध्येय आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत”‘

मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नयेत- गोपीचंद पडळकर

…म्हणून जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून वाजत गाजत गावातून अंत्ययात्रा काढली!

चिंता वाढली! मंगळवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 हजारांची वाढ

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More