बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जीव लावून लढला पण फक्त एका चुकीमुळं महाराष्ट्राच्या प्रवीणचं मेडल हुकलं!

नवी दिल्ली | टोकयो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या मिश्र गटात महाराष्ट्राचा प्रवीण जाधव आणि बिहारची दिपिका कुमारी हे दोघेजण देशाचं नेतृत्व करत होते. या दोघांनी क्वार्टर फायनलपर्यंत उत्तम खेळीचं प्रदर्शन केलं. मात्र, आज क्वार्टर फायनलमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

प्रविण जाधव याच्याकडून शेवटच्या राऊंडमध्ये एक चूक झाली होती. याच चुकीचा फटका देशाला बसला आहे. दक्षिण कोरियाच्या जोडीनं दिपिका आणि प्रविणच्या जोडीचा 6-2 असा पराभव केला आहे. यामुळे टोकिया ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या बाबतीत भारताच्या पारड्यात निराशा पडली आहे.

आजच्या मॅचमधील पहिले दोन सेट दक्षिण कोरियाच्या जोडीने आपल्या नावावर करुन घेतले. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दिपिका आणि प्रविणने आघाडी करत सेट आपल्या नावावर करुन घेतला. शेवटच्या सेटमध्ये देखीलह भारताने आघाडी टिकवून ठेवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी प्रविण केवळ 6 पॉईंट्स मिळवू शकला. क्वार्टर फायनलमध्ये प्रविणची हीच चूक भारताच्या पराभवाचं कारण ठरली आहे.

दरम्यान, आजचा हा सामना चांगलाच अतितटीचा झाला आहे. दिपिका आणि प्रविणची यापूर्वीची खेळी पाहता चाहत्यांना विजयाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना निराशा सहन करावी लागत आहे.

थोडक्यात बातम्या –

“महाराष्ट्राला शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापूजा करावी, 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती दूर होईल”

रायगड, रत्नागिरीसह नुकसानग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारची आर्थिक मदत; निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ वर्ग

मला पॉर्न कंटेंटच्या कामासाठी…; पॉर्नोग्राफी प्रकरणी सई ताम्हणकरचं स्पष्टीकरण

महाड व तळीये गाव वसवण्याबाबत गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले…

सुहागरातीसाठी फुलांनी सजवला बेड, नवरीनं पाहताच… व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More