‘या’ कारणाने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; सहा महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
अहमदनगर | महिला दिनाच्या दिवशीच कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे एका महिलेचा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे. अवघ्या सहा महिन्याआधी प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीच्या भांडणात पत्नीचा खून झाल्याने तालुक्यासह मिरजगाव हादरलं आहे.
8 मार्चला मिरजगावातील शंकर किशोर साळवे आणि पत्नी नेहा यांच्यात काही कारणास्तव कडाक्याचं भांडण झालं. यात किशोर याने नेहाला लाथाबुक्क्यांनी तर कमरेच्या पट्टयानं मारहाण करत तिचं डोकं भिंतीवर आपटलं होतं. त्यावेळी घटनास्थळी नेहाची बहिण दिक्षा आणि तिचा लहान भाऊ हजर होते. दिक्षाने त्यांना समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते दोघंही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून दिक्षा आणि तिचा लहान भाऊ परत त्यांच्या गावाला जायला निघाले होते. ते दोघे रस्त्याने असतांना शंकर साळवेनं त्यांना फोन करून सांगितलं की नेहाने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. मी सध्या तिला मिरजगावाच्या दवाखान्यात घेऊन आलोय, तुम्हीपण ताबडतोब या. मात्र दिक्षा आणि तिचा लहान भाऊ परत येईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.
घटनेनंतर, कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालात डोक्याला अंतर्गत मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. हे कळताच मयताची बहिण दिक्षा ठोसर यांच्या फिर्यादीवरून शंकरवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मिरजगाव दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आहे. त्यानंतर आरोपी शंकर साळवे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीचा लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात वादातून निर्घृण खून केला आणि आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर
देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!
‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण
दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…
भर रस्त्यात माथेफिरुचा चौघांवर चाकू हल्ला; एका व्यक्तीचा मृत्यु, तीन जण गंभीर जखमी
Comments are closed.