बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बच्चू कडूंनी केलेली मदत ‘तो’ विसरला नाही; न सांगताच केलं कौतुकास्पद काम!

भोपाळ | बैरसीया भोपाळमधील अमितजी यादव यांच्या वडीलांना लिवर शस्त्रक्रिये करीता बेड मिळत नव्हता. त्यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमित यांच्या वडिलांना मदत केली होती.

बच्चू कडू यांनी केलेल्या मदतीची आठवण ठेवून यादव परिवाराने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बच्चू कडू आणि संपूर्ण शेतकऱ्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली आहे.

2007 मध्ये बैरसीया मधील अमितजी यादव यांच्या वडीलांच्या लिवर शस्त्रक्रिये करता बच्चू कडू यांनी मदत केली होती. मुंबई येथे 4 महिने त्यांच्यावर उपचार चालला होता. बच्चू कडू यांनी अमित यांच्या वडिलांना आमदार निवासातील स्वतःचा बेड देऊन बच्चू कडू खाली झोपले होते.

दरम्यान, राजधानी दिल्ली सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दिल्लीला पोहोचले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘परिस्थिती सुधारली नाही तर…’; छगन भुजबळांचा नाशिककरांना इशारा

“राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही”

“भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही”

शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटतं- अनुपम खेर

“नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More