बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘… तो वाघच नसतो त्याला पालतू कुत्रा म्हणतात’; नितेश राणे

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची परिषद दोन दिवसांसाठी भरवण्यात आली होती. त्यामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वाघ आणि आमची जवळीक चांगली असून, वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते आणि नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या संदर्भात राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कस मध्ये असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा म्हणतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

बाकी समझदारोंको इशारा काफी है, असं म्हणत अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या बैठकीत सत्ताधारी विरोधी पक्षातील ओबीसी नेते या परिषदेला उपस्थित होते. परिषदेची रविवारी सांगता झाली.

दरम्यान, बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा, असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत वड्डेटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का?; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

‘बिग बाॅस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More