Top News महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक!!! प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत लपवला

पालघर | मुंबईतील पालघरमध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. तरुणाने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत तीन महिने लपवून ठेवला होता. तरूणीने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिची हत्या केली.

वाणगावमधील वृंदावन या सदनिकेल्या एका फ्लॅटच्या भिंतीत तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केलं. शिवाय तो याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून भाड्याने राहात होता.

उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरूणी प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यास घरातून निघून गेली होती. चार महिने झाले तरी घरी न आल्याने घरच्यांनी तिची शोधशोध सुरू केली. आरोपी प्रियकर हा तरूणीचं सोशल मीडिया वापरत होता.

दरम्यान, तरूणीच्या घरच्यांशीही प्रियकर बोलत होता. मात्र घरच्यांना संशय आला त्यानंतर त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून तपासादरम्यान कबुली दिली.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत- राहुल गांधी

आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात राहू नका- अण्णा हजारे

“मुंबई-महाराष्ट्रातील देशी औवेसी कोण? ते लवकरच कळेल”

…यांच्या भजनांसमोर लता मंगेशकरांंचं गाणं फिकं पडतं- भगतसिंह कोश्यारी

सेना-भाजपमध्ये बॅनरवॉर, सुपर संभाजीनगर बोर्डासमोर भाजपचा ‘नमस्ते संभाजीनगर’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या