बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी भाजप पुरस्कृत असतो तर… – खासदार संभाजीराजे

सोलापूर | जनसंवाद यात्रेनिमित्त छत्रपती संभाजीराजे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी दुपारी मोहोळमध्ये मराठा समाजातर्फे जनसंवाद मेळावा पार पडला. यावेळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी. नाहीतर, पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येईल, असा इशाराही छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला दिला.

मोहोळमध्ये आगमन झाल्यानंतर संभाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते सभेच्या ठिकाणी चालत गेले. मराठा समाज मागासलेला नसून पुढारलेला आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या या सुनावनीनंतर संभाजीराजेंनी राष्ट्रपती कोंविद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सर्वांची भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

भाजपने त्यांना संसदेत बोलू दिलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सगळे मला म्हणतात, मी भाजप पुरस्कृत आहे. काहीजण म्हणतात, माझे राष्ट्रवादीसोबत चांगले संबंध आहेत. तर अनेकजण मला काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत म्हणतात. पण मी जर भाजप पुरस्कृत असतो, तर मला भाजपने आरक्षणासंदर्भात संसदेत बोलू दिलं असतं, असंही संभाजीराजे म्हणाले.

माजी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेटीनंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितलं असल्याचं संभाजीराजेंनी जनसंवाद मेळाव्यात स्पष्ट केलं. केलेल्या प्रयत्नांचा काहीच उपयोग झाला नाही. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाँग मार्च हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांना यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

“आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय”

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर

“आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो”

“राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More