बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पतीने आपल्या पत्नीची प्रियकरासोबतच बांधली लगीनगाठ!

नवी दिल्ली | लग्नाच्या काही काळानंतर पती किंवा पत्नीला आपला जोडीदार सोडून दुसऱ्या कोणावर तरी झाल्याचं आपण ऐकलं आहे. यातून अनेकांचे घटस्पोट होतात. मात्र आपल्या बायकोचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचं कळाल्यानंतर पतीने स्वतः आपल्या बायकोचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

संबंधित घटना बिहारमधील असून सूल्तानगंज येथील एका जोडप्याचं लग्न सात वर्षांपुर्वी झालं होतं. काही वर्ष त्यांचा संसार अगदी व्यवस्थित चालू होता. त्यांना दोन मुलं देखील झाली. मात्र लग्नाच्या सात वर्षांनंतर संबंधित पत्नीला दुसऱ्या पुरुषावर प्रेम झालं. पत्नीचं नाव सपना असं आहे. तसेच सात वर्षांपुर्वी सपनाचं लग्न उत्तम सोबत झालं होतं. यानंतर उत्तमला आपल्या पत्नीच्या बाहेरील प्रेमसंबंधांबद्दल समजलं. तिच्या या संबंधांना उत्तमने म्हणजेच सपनाच्या पतीने आणि त्याच्या परिवाराने विरोध केला.

विरोध केल्यानंतर देखील सपनाने आपले प्रेमसंबंध चालू ठेवले. अनेकदा विरोध करुन सुद्धा सपनाने न ऐकल्यानं उत्तमने वैतागून सपनाचे तिच्या प्रियकरासोबत लग्न आयोजित केलं. या लग्नामध्ये दोन्ही बाजूचे लोक उपस्थित होते. एवढच नाही तर सपनाच्या दोन मुलांनी देखील या लग्नात उपस्थिती लावली. लग्नाच्या दरम्यान उत्तमच्या डोळ्यात पाणी होते. मात्र त्याने बायकोच्या प्रेमासाठी आपल्या संसाराचा त्याग केला.

दरम्यान, सूल्तानगंज येथील दुर्गा मंदिरात हे लग्न पार पाडलं. अशाप्रकारच्या लग्नाची माहिती मिळताच लग्नाच्यावेळेस अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडीमध्ये श्रेय वादाची लढाई?; मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More