बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोल्हापूरचा गडी कोथरूडला आलाय, पण आमच्या अंगावर येऊ नका”

पुणे | आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विविध पक्षांचे नेते सध्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातल्या भोसरीत शिवसेनेची सभा घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपला चिमटे काढले आहेत. त्यावेशी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात. पण ते ठिक आहे. ते घासून निवडून आले असतील. यावेळी आपण घासून का होईना पण ठासून निवडून येऊ. चंद्रकांत पाटलांना पुण्यात येऊ द्या. हा महाराष्ट्र आहे. कोल्हापूरचे गडी पुण्यात आले त्याचं वाईट वाटत नाही. फक्त आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.

सभेत बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. माझयाकडे कोणीतरी तक्रार केली की पालकमंत्री आमचं ऐकत नाहीत. अजितदादांना आपण सांगू. नाहीतर आपण मुख्यमंत्र्यांना सांगू. अजितदादा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना जर आपलं ऐकायचं नसेल तर आज मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहे, अशी मिश्किल टिप्प्णी देखील राऊतांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीत हवा पहायला गेले आहे. काही दिवसांनी आपल्याला दिल्लीत देखील जायचं आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊतांच्या भाषणावेळी सभागृहात ऐकच हशा पिकलेला पहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या-

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय’”

“भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार”

गेली 70 वर्षे ‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाची सत्ता येते

“हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा”

पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप; महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More