बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परिवारचं प्रेम बघण्यासाठी रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, मात्र झालं असं की…

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील मिरझापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका तरुणाने आपल्या कुटुंबातील लोकांचं आपल्यावर किती प्रेम आहे हे तपासण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला. मात्र हे करणं त्याला प्रचंड महागात पडलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित तरुणाचा नाव इश्तियाक असं आहे. इश्तियाकने आपल्या अपहरणाचा कट रचला आणि घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या भावाने त्याचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवली होती. इश्तियाकने स्वत:च फोन करून एका व्यक्तीने अपहरण केल्याची घरी सूचना दिली.

अपहरणाची तक्रार असल्याने पोलिसांनी देखील आपली सूत्र तातडीने हालवली आणि तरुणाचा शोध लावला. यादरम्यान तरुण प्रयागराच्या सोराव भागात सापडला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाची कसून चौकशी केली. यावेळी आपणच हा कट रचला असल्याचं इश्तियाकने कबूल केलं.

दरम्यान, चौकशीमध्ये सांगताना आपल्या परिवाराचं आपल्यावर किती प्रेम आहे हे तपासण्यासाठी आपण हा कट रचला असल्याचं इश्तियाक ने सांगितलं. तसेच घरातल्या सदस्यांवर नाराज होऊन इश्तियाक बेपत्ता झाला होता. मात्र खोटी माहिती दिल्याबाबत इश्तियाकला दंड ठोठवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

राखी सावंतचा नवा ड्रामा ‘या’च्यासाठी झाली दिवानी मस्तानी; पाहा व्हिडीओ

‘…त्यावेळी संभाजीराजेंनी तोंड का उघडलं नाही?’; बी.जी. कोळसे पाटलांची संभाजीराजेंवर टीका

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More