बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जारवो म्हणतो ‘मी पुन्हा येईल’; “भारताला माझी गरज…”

दुबई | क्रिकट चाहते जगभर आहेत. सध्या युएईत विश्वचषक पहाण्यासाठी आणि आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी अनेक चाहते युएईत दाखल होत आहेत. अशातच भारतीय संघाचा एक चाहता ज्यानं इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत भलताच धुमाकूळ घातला होता. आठवतोय का तो जारवो ?, तो जारवो पुन्हा येण्याची तयारी करत आहे.

भारत इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत जारवोनं आपल्या कृतीनं सर्वांना चकित केलं होतं. आता भारताच्या न्यूझीलंडसोबतच्या सामन्यापूर्वी जारवोनं ट्विट करत आपण तयार असल्याचं म्हटलं आहे. टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताला माझी गरज आहे का?, मी तयार आहे येण्यासाठी असं ट्विट जारवोनं केलं आहे. परिणामी त्याच्या या ट्विटची जोरदार चर्चा होतं आहे.

पेशानं युट्युबर असणारा जारवो भारताचा इंग्लिश चाहता आहे. आपल्या प्रसिद्धीसाठी जारवो भारतीय संघाला पाठिंबा देत असतो. लाॅड्स कसोटीत भारतीय संघाच्या समर्थनार्थ जारवो भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. परिणामी तेथील सुरक्षारक्षकांची आणि व्यवस्थापकांची मोठी तारांबळ उडाली होती. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं असं कृत्य करणं योग्य नाही म्हणून जारवोच्या या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, भारत आपला विश्वचषकातील दुसरा सामना न्यूझीलंडविरूद्ध 31 तारखेला खेळणार आहे. अशातच जारवोचं ट्विटनं सर्व चाहत्यांना पुन्हा भारताच्या समर्थनार्थ जारवो मैदानात दिसण्याची शक्यता आहे. यामुळं सुरक्षा रक्षकांची चिंता वाढू शकते.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

न्यूझीलंडविरूद्ध हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; विराट कोहली म्हणतो…

‘केवळ धर्माच्या आधारावर भेदभाव करणं…’; विराटचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

“आम्ही कलानी आहोत, कलानी कुणाला घाबरत नाहीत”

“माझा देखील आर्थर रोडचा दोन वर्षांचा अनुभव, गृहमंत्री असताना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More