बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

कोल्हापूर | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात सध्या एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच प्रताप सरनाईकांनी आपल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडले जात असल्याचा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्थानिक पातळीवर काही शिवसैनिक दोन्ही काँग्रेसमध्ये आले असतील. मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाही. उलट कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सदस्य कमी असतानाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे शिवसेनेला दिली असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

आज कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच शिवसेनेला गोकुळ दूध संघातही स्थान दिलं गेलं आहे. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलं आहे, ही बाब शिवसेने लक्षात घ्यावी, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजपकडून सुडाचं राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं- राज ठाकरे

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; नव्या चर्चांना उधाण

“सत्ता गेल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, पण कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार”

पुन्हा युती होऊ शकते, प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले- गिरीश बापट

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More