“मोठ्यांनीही चूक केली तर लहानेही काय करू शकतात हे दाखवून दिले”
मुंबई | राज्यात आगामी महापालिका निवडणुकांवरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यातच राज्यात पक्षांतराला देखील जोर आल्याचं चित्र आहे. परभणी येथील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासोबत मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, नांदेड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतील आमच्या सहकारी पक्षांचा राग आलाय. मोठ्यांनीही चूक केली तर लहानेही काय करू शकतात? ,हे दाखवले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. सर्व पक्षांचा समन्वय असावा, अशी आमची भूमिका होती, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आम्ही आज सुरूवात केली आहे. कोणाला प्रलोभन आम्ही देत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
आमच्या सहकारी पक्षांनी मालेगाव भिवंडी येथे जे काही केलं आहे त्याचा राग आलाय पण द्वेष नाही, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. मोठ्यांनी मोठ्या पद्धतीनं राहिलं तर त्याचा सन्मान होतो. परंतु, मोठ्यांनीच जर चुकीच्या पद्धतीनं वागलं तर लहानही मोकळा राहू शकतो, हाच संदेश या निमित्ताने़ं देत आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
दरम्यान, प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. सरकारमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत. समन्वयाने वागावे. तसेच महाविकास आघाडीमध्ये यामुळे कुरबुरी नाहीत, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला मानसिक रोग झाला आहे. पहाटेचं सरकार गेलं तेव्हापासून भाजपचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही”
काय सांगता??? फक्त 7 ते 8 रुपयात 100 किमी धावणार, ‘ही’ गाडी धमाल करणार!
प्रीति झिंटाने शाहरुख खानला विकत घेतलं, आर्यन-सुहाना बघतच राहिले
“अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेमधून बाहेर जावं लागेल”
“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणूनच…”
Comments are closed.