बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! पत्नीचे दागिने विकून पठ्ठ्याने रिक्षाला बनवलं रुग्णवाहिका

भोपाळ | देशभरात कोरोनाचं संकट वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र या कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. अशाl भोपाळमधील जावेद खान याने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

भोपाळमध्ये रिक्षा चालवणाऱ्या जावेद खानने पत्नीचे दागिने विकून रिक्षेला रुग्णवाहिका बनवलं. या रिक्षातून रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही, त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम जावेद करत आहे. त्याच्या कामामुळे सोशल मीडियावर त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे.

मी सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवर पाहिलं की, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने लोकांना रुग्णालयात पोहोचायला अडचणी येत आहेत. यानंतर मी हे काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मला माझ्या पत्नीचे दागिने विकावे लागले, असं जावेदने माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ऑक्सिजनसाठी मी दररोज रिफील सेंटरच्या बाहेर रांगेत उभा राहतो. मी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हे काम करीत आहे. यादरम्यान मी 9 गंभीर रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं आहे, असं जावेदने सांगितलं आहे. जावेदने लोकांची मदत करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जावेदचं काम पाहून लोक त्यांला सॅल्यूट करत आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

कोरोनाने आई, वडिल आणि भवाचा मृत्यू; घरी न जाता रुग्णांची सेवा करत राहिली महिला डॉक्टर

“मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार नाही हे दुर्दैव”

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता, पण…- राजेश टोपे

भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींचा संपूर्ण साठा सरकार का विकत घेत नाही?- सर्वोच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More