बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवती पत्नीच्या पोटाला दगड बांधून त्याने तिला तलावात ढकललं अन्…

अहमदनगर | अहमदनगमधील पारनेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरोदर असलेल्या महिलेला तिच्याच पतीने अगदी निर्दयीपणे संपवल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे पत्नी गरोदर असताना आरोपीने बाळाचा विचार न करता पत्नीच्या पोटाला दगड बांधला.

या घटनेतील आरोपीचं नाव पोपट जाधव तर आरोपीच्या मृत पत्नीचं नाव नंदा जाधव असं आहे. चार वर्षापूर्वी नंदा जाधव हिचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदाला नेहमी त्रास देत होता. काही काळानंतर नंदा गरोदर राहिली. ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर आरोपी जाधव तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.

३० मार्च रोजी आरोपीने नंदा हिच्या पोटाला दगड बांधून तलावात फेकून दिले. त्यानंतर पाच दिवसांनी ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी जाधव फरारी झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप तपास करीत आहेत.

दरम्यान, पत्नी गरोदर राहील्यामुळे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने निर्दयीपणे तिची हत्त्या केली. नंदा पाच महिन्यांची गरोदर असताना तिची हत्या करण्यात आली. यादरम्यान मृत्यू नंतर तिचं मृतदेह पाण्यावर तरंगु नये म्हणून त्यानं तिच्या पोटाला दगड बांधला होता.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

राज ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या ‘या’ 8 सूचना

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More