रुपाली ठोंबरे संतापल्या; राज ठाकरेंनाही सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) हे राज्यपालांच्या वक्तव्यावर गप्प का बसले?, असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी सरकारवर (Goverment) तसेच राज ठाकरेंवर टीका केलीये.

आजचा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला आहे. शिवाजी महाराजांविरोधात भाजप (BJP) नेते सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत. त्याविरोधातील हा मोर्चा आहे, असं त्या म्हणाल्यात.

भाजपचंही आंदोलन होत आहे. लोकशाहीत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या मोर्चाची आणि आमच्या महामोर्चाची तुलना होऊच शकणार नाही. त्यांच्या मोर्चात काही अंध भक्त दिसतील, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्यात.

राज्यपाल बोलले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अळीमिळी गुपचिळी भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांचा ग्रुप आपल्या स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून भाजपसोबत गेला, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो, असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत, असा टोला रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-