बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यानं फक्त माझा वापर केला’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई | बाॅलिवूडमध्ये काम केल्यानंतर ‘लव स्कूल’ मधून प्रसिद्धीस आलेली अनुषा दांडेकर हीने आपल्या ब्रेकअप वर मौन सोडलं आहे. ‘लव स्कूल’ या शो मध्ये अनुषा सोबत होस्ट करत असणारा करण कुंद्रा याने देखील याच शो मधून प्रसिद्धी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे करण आणि अनुषा हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांच्या ब्रेकअप झाला आहे.

करण आणि अनुषा यांच्या ब्रेकअपला आता एक वर्ष झालं. अनुषा तिच्या इन्स्टा आकाऊंटवर प्रचंड अॅक्टीव्ह असते. ती सतत तिच्या हाॅट आणि सेक्सी अंदाजमधील फोटो पोस्ट करत असते. अशातच तिने तिच्या चाहत्यांशी बोलण्याकरता एक लाईव्ह सेशन ठेवलं होतं. यामध्ये तिने तिच्या ब्रेकअपचं कारण स्पष्ट केलं आहे.

या सेशनमध्ये बोलताना करणने तिला फसवलं असल्याचं अनुषाने सांगितलं आहे. एवढंच नाही तर करण एकाच वेळी दोन जणींना डेट करत असून अनेक वर्ष तो माझ्या भावनांशी खेळत होता, असं अनुषाने म्हटलं आहे. त्यांच्या ब्रेकअपनंतर आता अनुषा एका ऑस्ट्रेलियन गायक जेशन शाह याला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, करणचा खरा चेहरा समोर येताच अनुषाने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं असल्याचं तिने सांगितलं आहे. अनुषा ही मुळची ऑस्ट्रेलियाची आहे. तिचा जन्म देखील तिकडचा असून भारतात तीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘डेल्ही बेल्ही’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘अँथनी कौन है?’, या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चेन्नईच्या संघासोबत खेळायची संधी सांगून तरुणाची मोठी फसवणूक, प्रकरण पोलिसात

…तर सीरमची एकही गाडी महाराष्ट्रबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

कोरोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबिजची लस, ‘या’ ठिकाणच्या घटनेमुळं एकच खळबळ

अखेर पुण्यावर केंद्राची कृपादृष्टी, कोरोना लसीचे 3 लाख 73 हजार डोस मिळणार

राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून ‘या’ नियमात बदल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More