बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युवराज सिंगला हरियाणात अटक! ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे 3 तास कसून चौकशी

मुंबई | भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर युवराज सिंग चंदिगडला पोहोचला. त्याठिकाणी त्याला हरियाणातील हिसार पोलिसांनी अटक केली आणि चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. या प्रकरणी युवराज सिंगने सोशल मीडियावर जाहीर माफी देखील मागितली आहे.

गेल्या वर्षी रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅटमध्ये भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलवर अनुसूचित जातीबद्दल अपमानस्पद युवराज सिंगने वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवराजविरोधात हांसी पोलीस ठाण्यात एससी-एसटी कायदा आणि आयपीसीच्या कलमाअंतर्गत आरोप केला होता. त्यानंतर हा प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात रजत कलसन यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

मला हे स्पष्ट करायचे आहे, की मी कधीही जाती, रंग, वर्ण आणि लिंगाबाबत कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास ठेवला नाही. लोकांच्या भल्यासाठी माझे आयुष्य दिले आहे आणि ते आजही चालू आहे. त्यावेळी मी माझ्या मित्राशी बोलत होतो, माझा मुद्दा चूकीचा समजला गेला, जो निराधार आहे, तरी देखील एक जबाबदार भारतीय असल्याने मी हे सांगू इच्छितो, की जर मी अजाणतेपणे कोणत्या भावना दुखावल्या असतील, तर मला त्याबद्दल खेद वाटतो, असं युवराजने सोशल मीडियावर पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 304 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर टी-20 प्रकारामध्ये 58 सामन्यात भारताच्या संघात एक महत्वाचा खेळाडू म्हणून कामगरी केली आहे. तसेच युवराज सिंगने 40 कसोटी सामने देखील भारताकडून खेळले आहेत.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘हाफ चड्डी बदलली, डोळे मारण्याचे दिवस गेले’; युवकांना बोलताना उदयनराजेंनी मारला डोळा; पाहा व्हिडीओ

”ती’ गोष्ट माझ्या कायम स्मरणात राहील’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

दिलासादायक! तब्बल 18 महिन्यानंतर मुंबईत एकही कोरोना मृत्यू नाही; पाहा आजची आकडेवारी

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

T-20 वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात; ‘या’ देशाने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More