बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ हे स्टंटचेही असतात. आपल्याला स्टंट करणं पाहायला सोपं वाटतं पण प्रत्यक्षात मात्र ते खूप अवघड आहे. कोणताही स्टंट करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला खूप सरावची गरज असते.

स्टंट करत असताना आपल्या संपूर्ण शरिराचा तोल सांभाळता येणं फार आवश्यक असतं. त्याचप्रमाणे स्टंट करण्यासाठी आपलं शरिर ताठर असून चालत नाही. ते लवचिक असायला हवं. तरच आपल्याला कोणत्याही प्रकारचे स्टंट करता येतील. अन्यथा काही केल्या येणार नाही.

सध्या सोशल मीडियावर एका तरूणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका घोड्यावर बसला असून, त्यावर तो स्टंट करत आहे. सुरूवातीला तो घोड्याच्या पाठीवर बसला असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तो घोडा खूप वेगात धावू लागतो. त्या परिस्थितही तो तरूण आपली स्टंटबाजी करत आहे.

एकदा डाव्या बाजूने खाली पाय टेकवत आहे. तर एकदा उजव्या बाजूने पाय टेकवत आहे. पुढे तर तो चक्क वेगात पळणाऱ्या घोड्यावर आपले हात सोडून उभा राहिला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओमधील तरूणाची स्टंटबाजी पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. तसेच बऱ्याचजणांनी या व्हिडीओ अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या- 

षटकारांचा बादशाह मात्र अजूनही संधी नाही, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं दिली खेळ सोडण्याची धमकी

मे महिन्यात महाराष्ट्रात मृत्यूतांडव, दर तासाला झाले इतके मृत्यू

कोरोनामुळे नोटांचा उडतोय रंग, ‘हे’ ठरतंय कारण!

तिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार

8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More