बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्लफ्रेंडसाठी करत होता ‘हे’ काम, पोलिसांनी पकडल्यावर अशी झाली पोलखोल

नवी दिल्ली । थोड्याच दिवसात ‘व्हॅलेंटाइन डे’ येणार आहे. प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. पण काही प्रेमीयुगूल याचा चुकीचा अर्थ घेतात आणि प्रेमाच्या नादात काय करतात त्याचे त्यांना भान राहत नाही. अशीच एक चकित करणारी घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या मैत्रिणींला फिरवण्यासाठी बाइक चोरायचा. हे समोर आल्यावर सगळीकडे एकच खळबळ उडाली.

मीडिया रिपोर्टनुसार, या चोराचे नाव सचीन असं आहे. तो दिल्लीतील यादव नगर येथे राहणारा आहे. चौकशी दरम्यान त्यानं पोलिसांना सांगितलं की, तो आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी लोकांच्या बाईक चोरायचा आणि कवडीमोल भावाने विकायचा. त्या सर्व पैशांनी प्रियसीला खूश करायचा. आत्तापर्यंत त्याने 4 मोटारसायकली चोरल्या आहेत.

अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. मात्र यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. यादव नगर भागात बाईक चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आणि त्याच वेळेस तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

चौकशीनंतर आरोपीकडून आणखी 3 मोटारसायकल सापडल्या. या बाईक त्यांच्या मालकांकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या एक नाही तर अनेक मैत्रिणी आहेत. त्यांना फिरवल्यानंतर बाईक विकून नवीन दुचाकी चोरी करत होता. ही गोष्ट समोर येताच पोलिसही चक्रावले.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरे म्हणजे पवळा तर अजित पवार म्हणजे ढवळा, ढवळ्या शेजारी बांधला पवळा अन्…”

फेसबुकला मोठा झटका! गमावले दररोजचे ‘इतके’ लाख युजर्स

“2024 पर्यंत सहन करू, पण आम्ही झुकणार नाही”; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

Skin care Tips: कोरडी त्वचा असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More