बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महिलेसमोर नाक घासायला लावलं’, अपमान सहन न झाल्यानं तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

पुणे | पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका 29 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामगाचंही कारण धक्कादायक असल्याचं समोर आलं आहे.

आत्महत्या करणारा सचिन तळेकर (Sachin Talekar) महापालिकेच्या शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. महापालिकेत कामाला लागण्यासंदर्भात एका महिलेनं सचिनसशी संपर्क साधला. कागदपत्रे देत आणि तीन चार जण भेटायला येत असल्याचं महिनेनं सचिनला सांगितलं. मात्र मला फक्त तुम्हालाच भेटायचं आहे, असं सचिन म्हणाला आणि या वाक्यावरुन गैरसमज झाला आणि तीन चार जणांनी सचिनला बेदम मारहाण केली.

बेदम मारहाण करत महिलेसमोर नाक घासायला लावल्यामुळे सचिनला त्याचा अपमान झाला वाटलं. हा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. त्यामुळे सध्या परिसरात एकट खळबळ उडाली.

दरम्यान, अपमान सहन न झाल्याने सचिन तळेकरने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना डुडुळगाव इथे घडली आहे. या घटनेनं सचिनच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ

‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

‘राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा

राधे माँच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

दिलासादायक ! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More