देश

तो स्कूटर घेऊन गल्लीबोळात हिंडत होता; स्कूटरमध्ये निघाली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

नवी दिल्ली | दिल्लीमधील भागात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्ज म्हणून घेतलेले पैसे मित्र परत करत नाही या रागातून ही हत्या करण्यात आली.

मित्राची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह स्कुटरच्या पुढील भागात ठेवून मृतदेह निर्जनस्थळी नेऊन फेकून देण्यात आला. या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आऱोपी मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत असतानाची दृष्य कैद झाली आहेत.

सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृष्यांमध्ये आरोपी आपल्या स्कुटरवर पायाजवळ एक पांढऱ्या गोणीमधून मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनिटांनी आरोपी एका मोकळ्या जागी थांबला आणि त्याने मृतदेह असणारी गोणी फेकून दिली.

आम्ही यासंदर्भात आमच्या खबऱ्यांना माहिती दिली आणि स्थानिकांकडे चौकशी केली असता स्कुटरवरील व्यक्तीचे नाव अंकित असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अंकितला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार

जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

भारतीय संघाच्या खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही; बीसीसीआयचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या