देश

गोणीत घालून नाल्यात फेकलं तो २४ तास ओरडत होता; धक्कादायक कारण आलं समोर

खेडा | विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एका व्यक्तीला गोणीत बांधून थेट नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे

गुजरातच्या खेडा येथील चिकलोद गावात हा प्रकार घडला आहे. महिलेच्या भावाने मनात राग धरुन जीवन नावाच्या व्यक्तीला गोणीत घालून नाल्यात फेकून दिलं. जीवन राठोड असं या व्यक्तीचं नाव आहे.

जीवन राठोड हा शेतकरी आहे. त्याचे एका विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये वारंवार फोनवर बोलणं व्हायचं आणि भेटणंही होत होतं. संबंधित महिलेच्या भावांच्या मनात याबाबत राग होता.

पोलिसांनी गोणी बाहेर काढून या राठोड याला वाचवलं आणि उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. नशीब बलवत्तर होतं म्हणून गोणीत बांधून नाल्यात फेकल्याच्या 24 तासांनंतरही तो जिवंत बाहेर आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही”

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना मोठा झटका!

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा

राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या