बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो एकटा निघाला…’, अमोल कोल्हेंनी शरद पवारांवर लिहिली ‘ही’ खास कविता

पुणे | जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त शिरुर येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ‘तो एकटा निघाला’ कविता लिहिली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार या झंझावतास प्रणाम केला आहे. शरद पवार यांना वंदन करत असल्याचे डाॅ. कोल्हे यांनी सांगितले आहे. ही कविता कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली आहे.

पुरोगामी महाराष्ट्रातून फुंकार एक उमटला, पुरोगामी महाराष्ट्रातून फुंकार एक उमटला, तुडवित रान, उधळित प्राण तो एकटा निघाला… रक्ताळले पाय जरी काट्यांनी रक्ताळले पाय जरी अगळीत घाव ते उरावरी ओडखडा पडी काळजावरी कधी न उमटू दिला, तो एकटा निघाला…

बदनामीचे पचवून प्याले, बदनामीचे पचवून प्याले, विराधाचे झेलून भाले… जिद्द पेरुन पावलात, ना थांबला, ना संपला, तो एकटा निघाला… बळीराजाची घेता साद, बळीराजाची घेता साद, कर्जमाफीचा क्षणी प्रतिसाद, स्वयंपूर्णता अन्न, धान्यात, देश उन्नतीचा मार्ग रेकीला… तो एकटा निघाला…

कला, क्रिडा, साहित्यप्रेमी, कला, क्रिडा, साहित्यप्रेमी, विश्व प्रगतीचे भान नेहमी तळहातांच्या रेषांपरी तयाने हा महाराष्ट्र जाणला… तो एकटा निघाला विज्ञानाची धरुनी कास, केला, सत्त शास्वत विकास, यशवंतरावांचा पट्ट शिष्य हा सच्चा वारस शोभला… तो एकाटा निघाला…

अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, मूर्त केले महिला धोरण… दूरदृष्टिच्या निर्णयांचा… तो धोरण कर्ता झाला… तो एकटा निघाला…

तत्वासाठी सदैव नडला…तत्वासाठी सदैव नडला…दडपशाहीला निर्भिड भिडला…तरुणाईच्या मनावरही संघर्ष योद्धा म्हणूनही जडला… जरी एकटा निघाला… जरी एकटा निघाला… तरी गारुड जनामनाला, जनसागर उसळत गेला… विकास गाण घुमवित छान… त्याने महाराष्ट्र घडविला तुडवित रान, उधळित प्राण, त्याने महाराष्ट्र घडविला.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

‘द चॅनेल 1’नं मारली बाजी; मराठी भाषेतलं पहिलं ओटीटी व्यासपीठ सुरु

प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी

‘भारत आणि इंग्लंड आता पुण्यात भिडणार पण…’; बीसीसीआयचा मोठा निर्णय

‘महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे’; निलेश राणेंचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More