Top News देश

छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का

वाशिंग्टन | तंत्रज्ञानानं आपलं जग अगदी सोप्प करुन टाकलं आहे. मात्र ते नीट वापरता आलं नाही तर धोकाही उद्भवू शकतो. असाच एक अनुभव अमेरिकेतील एका व्यक्तिला आला आहे.

संबंधित व्यक्ति नाव ब्रॅड असं नाव असून तो 38 वर्षाचा आहे.  ब्रॅड हा झोपलेला असताना त्याने कानात एअरपॅाड लावले होते. झापेच्या नादात त्याने ते एअरपॅाड गिळले आहेत.

ब्रॅडच्या छातीत दुखू लागल्याने तो डॅाक्टरांकडे गेला. त्यानंतर डॅाक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला तेव्हा रिपोर्टमध्ये समजलं की ब्रॅडच्या अन्ननलिकेत एअरपॅाड अडकला आहे. डॅाक्टरांनी एन्डोस्कोपी करुन हा एअरपॅाड बाहेर काढला.

दरम्यान, डॅाक्टरांनी ब्रॅडला एन्डोस्कोपी करण्याआधी इशारा दिला होता की एअरपॅाड जर आपल्या जागेवरुन घसरत खाली गेला तर पोटात किंवा फुफ्फुसातही जाऊ शकतो. मात्र ब्रॅडची सर्जरी यशस्वी झाली आणि धोका टळला. त्यामुळे इलेकेट्रॉनिक उपकरणांपासून आपण दक्षता घ्यायला हवी.

थोडक्यात बातम्या-

“पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काहींना मिरच्या झोंबल्या”

धावत्या ट्रेनमध्ये या मराठी अभिनेत्रीने छैया छैया गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडीओ

‘बिग बॅास’ शो अर्धवट सोडल्यास स्पर्धकाला चुकवावी लागते ‘एवढी’ किंमत

“भाजपबरोबर जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत म्हणून…”

…तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या