जालना महाराष्ट्र

“कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही”

जालना | ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

मी पक्ष, धर्म, जातपात सोडून मी फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा. ही प्रेरणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाली. ते आज हयात नाहीत. त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मनसे आमदार राजू पाटील नितीन गडकरींच्या भेटीला!

सिरमचे संस्थापक माझे मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण…- शरद पवार

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

“रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत, इतरांसारखे भिकारी नाहीत”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या