बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

मुंबई | प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या बैठकीत भविष्यात भाजपविरोधात स्थानिक पक्षांची आघाडी एकत्र करुन पर्याय उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीनंतर भाजपने पवारांवर टीका केली आहे.

भाजपचे अतुल भातखळकर यांनी खोचक ट्विट करून शरद पवारांवर नशाणा साधलाय. 2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेतलं नाही.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रीया दिली होती. कोणी कितीही रणनिती आखू दे, आजही मोदी आहेत आणि 2024 ला देखील मोदींच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता असेल, असं फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”

ह्रदयद्रावक! कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More