Headache and Migraine l डोकं दुखणं ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकांना नेहमीच त्रास देते. ‘आज माझं खूप डोकं दुखतंय’, ‘डोकं अगदी ठणकतंय’ अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो किंवा स्वतःच बोलतो.
महिलांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. बऱ्याच महिलांना नेहमीच डोकेदुखीचा त्रास होतो आणि त्यांना वारंवार वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. हा त्रास कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांनी (Nutritionist) एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.
डोकेदुखीची कारणे आणि उपाय :
आहारतज्ज्ञ सांगतात की, बहुतेक लोकांच्या डोकेदुखीचे किंवा मायग्रेनचे (Migraine) मुख्य कारण म्हणजे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन (Oxygen) न मिळणे. जर तुम्ही पाणी कमी पित असाल, वेळेवर जेवत नसाल किंवा तुमचा श्वास अपुरा असेल, तर मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होतो. त्यांच्या मते, 90 टक्के लोकांच्या डोकेदुखीमागे हेच मुख्य कारण असते.
Headache and Migraine l डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी उपाय :
पाणी प्या: डॉक्टर सांगतात की, जर तुम्हाला डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरू झाला, तर सगळ्यात आधी पाणी प्या. पाण्यातून ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे डोकेदुखी कमी होते.
पुरेसा आहार घ्या: डोकेदुखी कमी करण्यासाठी त्वरित पुरेसा आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी सकस, पौष्टिक आणि घरी तयार केलेले पदार्थ खा.
दीर्घ श्वसन (Deep Breathing): दीर्घ श्वसन काही मिनिटे केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला, तसेच मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.