Headache In Summer | दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होत आहे. काही दिवस कडक ऊन तर काही दिवस अवकाळी पाऊस, असं तापमान सध्या राज्यात दिसून येतंय. या बदलत्या हवामानामुळे आणि कडक उन्हामुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो. बऱ्याच जणांना हा त्रास अधिकच तीव्र जाणवतो.
आता ही डोकेदुखी एवढी का वाढते आणि त्यावर उपाय काय?, याचं उत्तर या लेखात दिलं आहे. तुम्ही त्या उपायांचा वापर करून तुम्हाला होणारा त्रास कमी करू शकता. या लेखात याची कारणे आणि उपाय सविस्तरपणे सांगितली आहे.
‘या’ कारणांमुळे होऊ शकते डोकेदुखी
डिहायड्रेशन होण्याची समस्या उन्हाळ्यात अधिक असते यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
उष्माघात झाल्यास डोकेदुखी वाढते किंवा उष्णतेमुळे अस्वस्थता निर्माण होते.
जास्त वेळ उन्हात राहिल्यास डोकेदुखी (Headache In Summer )होऊ शकते.
कोणताही विशिष्ट वास घेतल्यास डोके दुखते.
उष्णतेमध्ये जड व्यायाम केल्यास शरीर लगेच थकते आणि डोकेदुखी सुरू होते.
Headache In Summer l ‘असा’ मिळवा डोकेदुखीपासून आराम :
डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होत (Headache In Summer ) असेल, तर दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि तुमच्या आहारात द्रवपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. काकडी, टरबूज इत्यादी पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळे खाण्यास सुरुवात करा. काम असेल तरच घराबाहेर पडा. सूर्यप्रकाशात जाणे पूर्णपणे टाळावे. जर तुम्हाला उन्हात बाहेर जायचे असेल, तर तुमचे डोके पूर्ण झाकून घ्या. जेणेकरून सूर्यप्रकाश थेट डोक्यावर पडणार नाही.
यासोबतच सुगंधविरहित क्रीम, सनस्क्रीन आणि इतर लोशन वापरा. याच्या वासामुळे देखील तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात शरीर लगेच थकते. थोडे जरी शारीरिक श्रम अधिक असणारे कार्य केले किंवा उन्हात तीव्र व्यायाम केला तर डोकेदुखी होऊ शकते. यामुळे तीव्र व्यायाम टाळा.
त्या बरोबरच आहारात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट केल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे या काळात हिरव्या पालेभाज्या अधिक खा.जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.